गरीबांच्या घरातील बदाम अशी शेंगदाण्याची ओळख. शेंगदाण्याला स्वस्त बदाम म्हटले जाते. त्यामध्ये चवीसोबतच विविध प्रकारचे आरोग्याला लाभ करून देणारे आरोग्यदायी गुण आढळून येतात. घरात बसल्यावर मधल्या वेळेत टी.व्ही. पाहताना व प्रवासात भुक लागल्यावर खाण्यासाठी अनेकांना शेंगदाणे आवडतात. भाजलेले, खारवलेले व तळलेले शेंगदाणे अतिशय उत्तम लागतात. शेंगदाण्यामध्ये मॅगनीज, व्हिटॅमिन ई, फोलेट, फायबर, फॉस्फरस, झिंक, कॅल्शियम, लोह असतं. आरोग्य चांगले आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी, रक्त वाढीसाठी गुळ आणि शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.
1. शेंगदाण्यात अँटीऑक्सिडंट भरपूर असतं. त्यामुळे शेंगदाणे नियमित खाण्यामुळे पोटाचे आजार होण्याची शक्यता कमी असते.
2. शेंगदाण्यामध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असते. ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते.
3. त्यामध्ये असलेले कॉल्शियम, व्हिटॅमिन “अ’ आणि प्रोटीन मसल्स टोंड करण्यास मदत करते.
4.रोज भिजलेले शेंगदाणे खाल्ल्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
5. शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांच्यासाठी चांगले असते. हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.
6. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन “डी’ची मात्रा अधिक असते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात.
7. शेंगदाण्यात “ओमेगा-6” फॅटसुध्दा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीर आहेत. शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.
8. बदाम जसं मेंदुसाठी चांगलं असतं तसचं शेंगदाणे देखील पोषक असतात. शेंगदाण्यात असलेल्या “व्हिटॅमिन बी-3’मुळे मेंदूकडे रक्ताचा पुरवठा वाढतो.
9. शेंगदाण्यात “ओमेगा-6′ प्रमाणे “आमेगा-3′ मोठ्या प्रमाणात असल्याने केस गळणे कमी होऊन केसांची चांगली वाढ होते.
डॉ. आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर , संपर्क : 7385728886.