मुंबई – इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी पुण्यात झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सचा रोमाचंक लढतीत पराभव केला. पॅट कमिन्सने १५ चेंडूंत ५६ धावा फटकावून कोलकाताचा विजय साकार केला. मात्र या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघावर मोठ्या प्रमाणात टीका होतोय. त्यातच माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
विरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सच्या तोंडून ‘वडापाव’ हिसकावला अशी प्रतिक्रिया दिली. मात्र त्याची ही प्रतिक्रिया मुंबई संघाच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागली आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला काहीजण सोशल मीडियावर ‘वडापाव’ म्हणून चिडवत असतात. त्यालाच उद्देशून सेहवाग असं बोलला असल्याचा समज झाल्यानं मुंबई इंडियन्सचे फॅन्स भडकले होते.
दरम्यान मुंबई संघाचे फॅन्स भडकल्यानंतर सेहवागने स्पष्टीकरण देत आपल वक्तव्य तसं नव्हता म्हणत अर्थ स्पष्ट केला. तो म्हणाला, ‘मुंबईकरांचं सर्वात आवडतं खाणं वडापाव असल्यानं शहराला उद्देशून मी वडापाव म्हणालो. तसेच रोहित शर्माचा विचार करता मी स्वत: त्याच्या फलंदाजीचा फार मोठा चाहता असल्याचे सेहवागने नमूद केलं.
मुंबई इंडियन्सने 4 बाद 161 धावांचं आव्हान कोलकातासमोर ठेवलं होतं. प्रत्युत्तर कोलकाता संघाने १६ षटकांत ५ बाद 162 धावा करून विजयाची नोंद केली.