स्मार्ट किचन

पोळपाट-लाटणं आणि खलबत्ता एवढीच किचनची व्याप्ती आता राहिलेली नसून त्याने व्यापक स्वरूप घेतले आहे. ओट्याचा शेप, किचन ट्रॉली, शेल्फ आदींपासून स्वयंपाक करताना लागणारे सर्व अद्ययावत तंत्रज्ञान सद्यस्थितीला तुमच्या किचनमध्ये असणे आवश्‍यक आहे. यामध्ये फूडप्रोसेसर, ज्युसर, फ्रीज, ओव्हन, वॉटर प्युरिफायर आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

याशिवाय स्वयंपाक करताना त्याचा स्मार्टपणे वापरही करता येतो हे विशेष. सध्या “फास्ट फॉरवर्ड’ युगात तुमच्या घरालाही स्मार्ट बनवायचे असेल तर वरील गोष्टींचा प्राधान्याने विचार करणे आणि आमलात आणणे आवश्‍यक आहे.

प्रत्येक घर “स्मार्ट’ बनत गेले तर “स्मार्ट’ सिटी आकारास यायला वेळ लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.