सातारा- जिल्हाधिकाऱ्यांचे संचार बंदीचे आदेश डावलून गुरवार परजावरील एका घरात एकत्र जमून नमाज पठण केल्याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्तार पालकर, मुनूर कलाल, सल्लाउद्दीन अन्सारी, अखील शेख, मुज्जफर शेख, अब्दुला रशिद (सर्व रा. गुरूवार परज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुनिल कर्णे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल खाडे, सुनिल कर्णे, अमोल साळुंखे, अविनाश चव्हाण, धिरज कुंभार यांनी ही कारवाई केली.