१२ जणांचे नमुने पहिल्यांदा निगेटिव्ह
सांगली : इस्लामपूर येथील करोना बाधित कुटुंबातील आणखी ८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २५ वरुन १४ वर आली आहे.
यापूर्वी सौदी अरेबियातून आलेल्या चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. सौदी अरेबियातून इस्लामपूर येथे आलेल्या कोरोना बाधित पहिल्या ४ व्यक्तींचा चाचणी अहवाल दोनदा निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु त्यांना इस्लामपूर येथे घरी न सोडता त्यांचे मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतमध्ये संस्था क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान याच कुटुंबातील आणखी पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या व्यक्तींचे अहवालाची दोनदा तपासणी करण्यात आली. परंतु दोन्ही वेळा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. परंतु या पाच जणांमधील दाम्पत्याचे करोना बाधित बाळ आयसोलेशिन वार्डमध्ये असल्याने पाचमधील त्या बाळाच्या आई-वडीलांनी रुग्णालयातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिघांना डिस्चार्ज देवून त्यांचे देखील मिरज शासकीय तंत्रनिकेतन येथे संस्थां क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
तसेच त्या बाधित बाळाचे ११ तारखेला पुन्हा नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहे. २६ मार्च रोजी पॉझिटिव्ह आलेल्या तीन महिलांचा चाचणी अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला होता. त्यामध्ये इस्लामपूर येथील दोन व पेठवडगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. बुधवारी पुन्हा त्यांचे नमुने दुसर्यांदा तपासण्यात आले यावेळी ही त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच २७ मार्च रोजी पॉझिटिव्ह आलेल्या १२ व्यक्तींचे नमुने देखील बुधवारी पहिल्यांदा तपासण्यात आले. त्यांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. परंतु या बारा जणांची आणखीन एकदा तपासणी करण्यात येणार आहे.