मुंबई – अभिनेत्री राणी चॅटर्जी रिल्स गर्ल म्हणून देखील प्रसिद्ध आहे. साध्य आणि सिम्पल इन्स्टा रिल्स बनवून देखील वारंवार चर्चेत कस राहायचं हे तिला चांगलच जमत. चाहते देखील तिच्या या कलेचं स्वागत करतात. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये जरी ती फेमस असली तरी तिच्या कारनाम्यांमुळे तिची चर्चा साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील होत असते. वयक्तिक आयुष्यामुळे देखील ती नेहमी चर्चेत असते.
राणीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे आणि मिरर सेल्फीचा रील व्हिडिओ बनवत आहे. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचे ‘तुझमें रब दिखता है’ हे गाणे तिच्या व्हिडिओच्या मागे वाजत आहे.हा व्हिडीओ शेअर करताना फक्त प्रेम हवंय बाकी काही नाही असं कॅप्शन तिने लिहिले आहे.
View this post on Instagram
तब्बल एक वर्षांपूर्वी राणीचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता प्रेम पाहिजे म्हणणाऱ्या राणीच्या या व्हिडिओवर चाहते चांगलेच बरसले आहेत. चाहत्यांना यावर जोरदार कमेंटबाजी केली आहे. एकाने तिला आयफोन १० सोडून नवीन आयफोन घेण्याचा सल्ला दिला आहे. तर एकाने भेटेल भेटेल प्रेम नक्की भेटेल असंही म्हंटल आहे.