संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलिया भट्टच्या आगामी “गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे शूटिंग गत उन्हाळ्यापर्यंत पूर्ण होणार होते. तथापि, करोना व्हायरस आणि परिणामी लॉकडाऊनमुळे ते अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले. आता चित्रपट निर्माता आणि आलिया भट्ट ऑक्टोबरपासून या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहेत.
रिपोर्टसनुसार शूटिंग पुन्हा सुरू झाल्यास सर्वप्रथम आलियाचे सीन शूट करण्यात येणार आहे. या काळात काही “चीट शॉट्स’ देखील शूट केले जातील जे व्हीएफएक्स तंत्रज्ञानाद्वारे दुरुस्त केले जातील. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे चित्रपटाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याने चित्रपटातील मोठे सीन नंतर शूट करण्यात येणार आहे. या चित्रपटाचा सेट सध्या ऑक्टोबरमध्ये शूटिंगसाठी निश्चित करण्यात आला आहे. मार्च महिन्यात चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले होते.
दरम्यान, “गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसेन झैदी यांच्या “माफिया क्वीन ऑफ मुंबई’ पुस्तकावर आधारित आहे. तसेच छोट्या पडद्यावरील अभिनेता पार्थ समथान हा आलियासोबत मुख्य भूमिका करणार आहे. तथापि, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.