नवी दिल्ली – श्रेया घोषाल आणि त्यांचे पती शिलादित्य मुखोपाध्याय यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. गायिका श्रेया घोषाल यांनी सोशल मिडीयावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सोबतच शुभेच्छांबद्दल चाहत्यांचे आभारही मानले आहेत. आई बनल्यानंतर श्रेया घोषालवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
श्रेया घोषाल यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘परमेश्वराने आज दुपारी आम्हाला एक मुलगा दिला. हा माझ्या जिवनातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे. शिलादित्य, मी आणि आमचा परिवार खुप आनंदी झालो आहोत. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद’
View this post on Instagram
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गायिका श्रेया घोषाल यांनी प्रेग्नेंसीची माहिती दिली होती. त्यांनी ट्वीट करून म्हटले होते की श्रेयादित्य येत आहे. बेबी बम्पचा फोटोही शेअर केला होता. श्रेया घोषाल यांचे 2015 साली शिलादित्य मुखोपाध्याय यांच्यासोबत लग्न झाले होते. दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. प्रायव्हेट सेरेमनी लग्न करून त्यांनी चाहत्यांना सरप्राईज दिले होते.
Baby #Shreyaditya is on its way!@shiladitya and me are thrilled to share this news with you all. Need all your love and blessings as we prepare ourselves for this new chapter in our lives. pic.twitter.com/oZ6c6fnR6Z
— Shreya Ghoshal (@shreyaghoshal) March 4, 2021