मुंबई – गायक एपी ढिल्लों सध्या विशेष चर्चेत आला आहे. त्याच्या सुपरहिट गाण्यांनी तरुण वर्गाला वेड लावले आहे. ‘ब्राउन मुंडे’ सारखी ब्लॉकबस्टर गाणी देणारा एपी ढिल्लों त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून त्याचे नाव बॉलिवूडमधील एका मोठ्या स्टार किडशी जोडले जात आहे. ते नाव म्हणजे अभिनेत्री जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूर हिच्यासोबत… एपी ढिल्लों खुशी कपूरला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र आता त्याचे नाव अभिनेत्री बनीता संधू हिच्यासोबत जोडले जात आहे.
नुकतेच एपी ढिल्लोंचे ‘विथ यू’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात एपी ढिल्लोंसोबत अभिनेत्री बनीता संधू दिसत असून या दोघांची गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र या आता एक व्हिडीओ व्हायरल ज्यात दोघे ही किस करताना दिसत आहे. त्यांच्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या दोघांच्या डेंटिगची चर्चा सुरू झाली आहे. एपी ढिल्लों आणि बबीताचा हा व्हिडीओ बबीतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
या व्हिडीओत बबीताने ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर एपीने ऑफ व्हाईट रंगाचं फ्लोरल प्रिंटचं शर्ट परिधान केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत ‘तुम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहात का?’ असा सवाल नेटकरी करत आहे. तर अनेकांनी खुशीप्रती दु:ख व्यक्त केले आहे. याआधी एपी ढिल्लोंने खुशी कपूरच्या नावाने एक गाणे तयार केले होते. त्यानंतर एपी आणि खुशी यांच्यातील रोमान्सच्या बातम्यांनी जोर धरला होता. दरम्यान, बनीता संधूने याआधी ‘ऑक्टोबर’ चित्रपटात वरूण धवनसोबत काम केले आहे.