नवी दिल्ली – भारताची महिला महिला बाॅक्सर सिमरनजीत कौर हिला आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सिमनरला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे.
Happy on winning silver medal in the Olympic Qualifying event but will definately work hard to further improve my performance. #MissionTokyo2020 pic.twitter.com/I4jKc8LDAP
— Simranjitkaur (@Simranjitboxer) March 12, 2020
स्पर्धेतील महिलांच्या 60 किलो वजनी गटातील अंतिम फेरीच्या लढतीत सिमरनचा कोरियाच्या ओह योंजी हिने 5-0 असा पराभव करत विजय नोंदविला.
दरम्यान, सिमरन हिने उपांत्य फेरी गाठल्याने ऑलिम्पिकसाठी याआधीच स्थान निश्चित केले होते. सिमरने उपांत्य फेरीत तैपेईच्या शियू वू हिचा 4-1 असा दणदणीत पराभव करत आगेकूच केली होती.