नवी दिल्ली – दिल्ली सराफात चांदीचा दर 1,331 रुपयांनी कोसळून 54,351 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
दिल्ली सराफत सोन्याचा दर मात्र केवळ पाच रुपयांनी रुपयांनी कमी होऊन 51,145 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,726 डॉलर व चांदीचा दर 18.62 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
या घडामोडीबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, विविध घटनाक्रमामुळे जागतिक वायदे बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. त्यामुळे भारतीय सराफत सोन्याचा दर काही प्रमाणात कमी झाला असल्याचे दिसून आले.