भोपाळ – हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणावे का, याबाबत बराच वाद आहे. विशेष म्हणजे दक्षिण भारतातील सर्वच राज्यांना या भाषेला कट्टर विरोध आहे. असे असले तरी देशात सगळ्यांत जास्त बोलली जाणारी भाषा म्हणून हिंदीचेच नाव घेतले जाते. आता मध्य प्रदेशात याच भाषेतून वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.
बऱ्याच काळापासून त्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आता सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नव्या अकादमीक वर्षात विद्यार्थी हिंदीमधून डॉक्टर होण्याचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यानी रविवारी ही माहिती दिली आहे. मध्य प्रदेश हे एक प्रमुख हिंदी भाषिक राज्य आहे. तेथे आता खासगी आणि सरकारी अशा दोन्ही महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम इंग्रजीसोबतच हिंदीमध्येही असणार आहे.
दिवाळखोरीतून वाचण्यासाठी पाकिस्तानची धडपड; सरकारी कंपन्या, मालमत्ता विकण्याचा निर्णय
एका सहप्राध्यापकांनी सांगितले की, सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेणारे 60 ते 70 टक्के विद्यार्थी हे हिंदी माध्यमात शिकून आलेले असतात. अभ्यासक्रम इंग्रजीत असल्यामुळे पहिल्या वर्षाला त्यांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या अभ्यासक्रमात जी प्रस्थापित लेखकांची इंग्रजी पुस्तके आहेत तीच हिंदीत केली जाणार आहे.
मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करावं लागणार; 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम