दक्षिण भारतीय सिनेमांमधील सुपरहिट “थाडम’च्यां हिंदी रिमेकमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला कास्ट केले असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या लेटेस्ट माहितीनुसार सिद्धार्थ मल्होत्रा या सिनेमातून बाहेर पडला आहे.
मूळ तमिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकसाठी आदित्य राया कपूरची निवड झाली आहे. या रोलसाठी डायरेक्टर मुराद खेतानी दीर्घकाळापासून ऍक्टर शोधत होते.
आता त्यांचा शोध संपला आहे. हिरोईन म्हणून मृणाल ठाकूरची यापूर्वीच निवड झाली आहे. गंमत म्हणजे “थाडम’ च्या हिंदी रिमेकमध्ये आदित्य रॉय कपूर डबल रोलमध्ये दिसणार आहे. दक्षिणात्य सिनेमावर आधारलेला असल्याने त्यात ऍक्शनचा धमाका असणार हे तर अगदी उघड आहे. सिद्धार्थ मल्होत्राला काढून आदित्य रॉय कपूरची निवड करण्यामागे नेमके काय कारण होते, हे मात्र समजू शकलेले नाही.