लवयात्री मधून पदार्पण करणारी एक्ट्रेस वरिना हुसेन हिने अलीकडेच सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट टाकली आहे. यापुढे सोशल मीडियाचा वापर करणार नाही, असे तिने या पोस्टवर जाहीर केले आहे. इंस्टाग्रामवर तिला खूप फॅन आहेत.
मात्र स्वतः ला आमिर खानची फॉलोअर म्हणवणाऱ्या वरिना हुसेननेही आमीर प्रमाणेच सोशल मीडियापासून दूर जाण्याचे ठरवले आहे. “सोशल मीडियावरून बाहेर पडणार असल्याची घोषणा करावी लागायला नको. कारण सोशल मीडिया म्हणजे काही एअरपोर्ट नाही.
मात्र आपल्या मित्रांना आणि फॅन्सना माहित व्हावे, म्हणून आपण ही घोषणा करत असल्याचे तिने म्हटले आहे. आपले इंस्टाग्राम अकाउंट आपल्या टीमकडून मॅनेज केले जाईल. मात्र त्यावर केवळ कामाशी संबंधित पोस्ट असतील,’ असेही तिने म्हटले आहे. तिने तडकाफ्डकी असा निर्णय का घेतला हे समजले नाही.