पुणे – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे आयोजित ऑनलाइन महोत्सवात गुरुवारी (दि. 16 सप्टेंबर) “कार्यकर्ता ते नेता’ या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. यामध्ये गणेशोत्सवात कार्यकर्ता म्हणून घडलेल्या आणि आता विविध राजकीय पक्षांतील नेते संवाद साधणार आहे.
“रंगारी कट्टा-राजकीय नेत्यांशी दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमामध्ये कार्यकर्ता ते नेता ही त्यांची वाटचाल उलगडतानाच महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने रंगारी कट्ट्यावर खुमासदार गप्पा नागरिकांना ऐकता येणार आहे.
यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून महापौर मुरलीधर मोहोळ, कॉंग्रेसकडून गटनेता अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेकडून शहप्रमुख संजय मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शहराध्यक्ष वसंत मोरे आणि आरपीआयकडून राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी सहभागी होणार असून, त्यांच्याशी विनोद सातव संवाद साधणार आहेत. ुुु.लहर्रीीरपसरीळ.लो या संकेतस्थळावर कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.