पिंपरी – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवानिमित्त चिंचवड परिसरात शनिवारी (दि. ३०) सकाळी अथर्वशीर्ष पठण झाले. त्यामुळे परिस भक्तीमय झाला.
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव चिंचवड येथे होत आहे. त्यानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्त शनिवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजता सोहम् योग साधना वर्गाचे शिबिर झाले. सकाळी ७ वाजता सामुहिक अथर्वशीर्ष पठणाने स्वर गुंजले. त्याने परिसर भक्तीमय झाले. अथर्वशीर्ष पठणासाठी परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर सकाळी ९ ते १२ दरम्यान सामुहिक अभिषेक, नेत्र व दंत चिकित्सा शिबिरझाले. तर, दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवा झाली. यंदाचे संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे ४६२ वे वर्ष अहे.
आज गीत रामायण
रविवारी (दि. ३१) सकाळी ९ ते ४ दरम्यान आरोग्य व दंत चिकित्सा शिबिर होईल. दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वाजता श्री लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी यांचे कीर्तन होईल. सायंकाळी ६ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री सुनील देवधर यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री ८.३० वाजता ग.दि. माडगुळकर व सुधीर फडके यांची अजरामर कलाकृती, गीत रामायणचा कार्यक्रम श्रीधर फडके सादर करणार आहेत.
स्त्री जीवनावर आधारीत सुरेल मैफल
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता “ फिरुनी नवी जन्मेन मी” या स्त्री जीवनाला समर्पित मराठी भावगीतांच्या सुरेल मैफिलीने करण्यात आली. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, राजेश उमप, देवराज डहाळे आदी उपस्थित होते. या वेळी भारतीय विशेषतः महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये स्त्री जीवनात येणाऱ्या आनंदाच्या, सुखाच्या आणि आव्हानांच्या क्षणातील स्त्रियांची भूमिका विषद करणारे मनोरंजक आणि तेवढेच भावनिक क्षण सुरेल गायनाच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांसमोर सहभागी कलाकारांनी उभे केले. या वेळी राधिका अत्रे, पल्लवी आनदेव, राजेश्वरी पवार, आशिष देशमुख यांनी कार्यक्रमात रंगत भरली, प्रसन्न बाम,विवेक परांजपे, अभय इंगळे, अमित कुंटे, शैलेश देशपांडे यांनी संगत केली. तत्पूर्वी अपर्णा कुलकर्णी यांचे “क्रांतिवीर चाफेकर बंधू” या विषयावर व्याख्यान झाले.