पिंपरी, (प्रतिनिधी) – श्री सद्गुरू श्रीहरी खाडेबाबा महाराज यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ आयोजित केला आहे. पिंपळे गुरव येथील काटे पूरम चौकाजवळील बॅडमिंटन हॉलशेजारील मैदानात २५ मार्च ते १ एप्रिलदरम्यान सायंकाळी ५:३० ते ९ वाजता होत आहे.
या कार्यक्रमातून युवकांना, चांगला संदेश मिळेल व त्यांच्या जीवनात कोणत्या प्रकारचा बदल करायाला हवा. हा अनमोल संदेश मिळेल. त्यामुळेे जास्ती जास्त युवकांनी या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.
तसेच श्रीरामचरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोकुळलीला, गोवर्धनलीला, रामलीला, कंसवध, श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह, होमहवन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.