किवळे (वार्ताहर) – किवळे आणि ग्रामीण भागामध्ये पारंपारिक होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य अपर्ण करण्यात आला.
शितळानगर येथील शितलादेवी मंदिराच्या समोर मोठी होळी लावण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यात नारळ लावण्यात आले होते. सायंकाळी सात वाजता श्रींची आरती झाली. त्यानंतर महिलांनी होळीचे पूजन केले.
राजाराम असोरे यांनी होळीला पुष्पहार अर्पण करून होळी पेटवली. यावेळी पांडुरंग अवघडे, अमित शेट्टी, पोलीस पाटील संदीप थोरात, राज तावरे आदी उपस्थित होते. होळीच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.