हडपसर – काळेबोराटेनगर येथे शुक्रवार (दि.१७ ) ते रविवार ( दि.१९ ) या तीन दिवस श्रीमद भागवत कथा व श्री दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ६ ते ९ पर्यंत कथा व त्यानंतर महाप्रसाद असणार आहे. अशी माहिती नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी दिली.
काळेबोराटे नगर येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात हा महोत्सव तसेच युवा महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे. दररोज हरि किर्तन, हरि कथा ,कृष्ण प्रसाद व भागवत ग्रंथ वितरण असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे. इस्कॉन पुणे केंद्राचे अध्यक्ष राधेश्याम दास हे कथाकार आहेत.नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी केले आहे.