दगडूशेठ गणेश मंडळातर्फे यंदा श्री गणेश सूर्यमंदिर देखावा

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ ट्रस्टच्या 127 व्या वर्षानिमित्त यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन सजावट स्थळी ट्रस्टचे विश्‍वस्त, पदाधिकारी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले. मंत्रपठणाच्या जयघोषात यंदाच्या सजावटीच्या तयारीचा श्रीगणेशा झाला.

यावर्षी उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर ओडिसा राज्यातील विश्‍वप्रसिद्ध प्राचीन आश्‍चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये अनेक स्तंभी पद्मपीठाच्या सुवर्ण सिंहासनावर “श्रीं’ची मूर्ती विराजमान होणार आहे. सारसबागेजवळील मैदानावर सजावटीचे काम सुरू आहे. शिल्पकार विवेक खटावकर हे मंदिराचे काम करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)