Shreyas Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती १४ डिसेंबर रोजी समोर आली. मात्र आता तो धोक्याबाहेर आहे असल्याचं देखील त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे.
अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ ( Welcome to jungle ) या चित्रपटाच्या शुटींगमध्ये श्रेयस सध्या व्यस्त आहे. चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटले आणि तो लगेच जमिनीवर कोसळला.
त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रेयस बाबतचे वृत्त समोर येताच चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरु केली. या घटनेनंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली आणि आता तो बरा झाला आहे. एक-दोन दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ताज्या बातमीनुसार आता श्रेयसला उद्यापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रेयस तळपदेचे जवळचे मित्र चित्रपट निर्माते सोहम शाह यांनी नुकतंच एका मुलाखतीत श्रेयसच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे.
सोहम शाह म्हणाले, “श्रेयसच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार- आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत त्याला डिस्चार्जही देण्यात येईल. आज सकाळीच तो माझ्याकडे बघून हसला. आमच्या सगळ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट असल्याचे सोहम शाह म्हणाले.