‘साहो’त पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत श्रद्धा कपूर

बिग बजेट असलेल्या “साहो’ चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला असून यात प्रभास-श्रद्धा कपूर या जोडीचा अभिनय आणि दमदार ऍक्‍शनची झळक पाहवयास मिळाली. या चित्रपटाचे एक पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. ज्यात श्रद्धा कपूर पिस्तुल रोखताना दिसत होती. श्रद्धाचा हा लुक चाहत्यांना खूपच आवडला होता. तसेच चित्रपटातील श्रद्धाच्या भूमिकेबाबत त्यांच्या उत्सुकता वाढली होती.

“साहो’मधील भूमिकेबाबत श्रद्धाने सांगितले की, मी पहिल्यांदाच एका पोलीस ऑफिरसची भूमिका साकारत असून मी खूपच उत्साही आहे. ही भूमिका साकारणे माझयासाठी अभिमानाची बाब आहे. कारण देशातील अंतर्गत सुरक्षा ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांवर असते. या चित्रपटातून मी त्यांना रिप्रझेंट करत असल्याने मला अत्यानंद होत आहे, असे श्रद्धा म्हणाली.

दरम्यान, “साहो’ भारतातील ऍक्‍शन थ्रिलर चित्रपट मानला जात आहे. यात प्रभास दमदार ऍक्‍शन हीरोची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तसेच हे वर्ष श्रद्धासाठी खूपच यशदायी ठरणार आहे. कारण “साहो’शिवाय तिच्याकडे “छिछोरे’, “स्ट्रीट डान्सर’ आणि “बागी-3′ असे बीग बजेट असलेले चित्रपट आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.