Suruchi Adarkar : अभिनेत्री सुरुची आडारकर (Suruchi Adarkar) आणि अभिनेता पियुष रानडे यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पियुष रानडे तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर आता सुरुची पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लग्नानंतर आता सुरूचीने कामाला सुरुवात केली असून लवकरच ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसणार आहे.
‘का रे दुरावा’ या मालिकेतून लोकप्रिय झाल्यावर अभिनेत्री सुरुची आडारकर तब्बल आठ वर्षांनी झी मराठीवर दिसणार आहे. सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. विशेष म्हणजे नेहमी सोज्वळ, साधी-सरळ भूमिका साकारणारी सुरुची झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी मध्ये खलनायिकेची भूमिका साकारताना पाहायला मिळेल. या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
येत्या 6 जानेवारीच्या एपिसोडमध्ये सुरुची मालिकेत एन्ट्री होईल. मालिकेत आता ती नेत्राला त्रास देणाऱ्या खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. सुरुची शेवटची ‘छोट्या बायोची मोठी स्वप्न’ या मालिकेत दिसली होती. याशिवाय सुयश टिळक सोबतची ‘का रे दुरावा’ ही तिची मालिका सुपरहिट झाली होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली होती. त्यानंतर ती अंजली या मालिकेत दिसली या मालिकेदरम्यान तिचे आणि पियुष रानडेचे सूर जुळलेले होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.