“भारत बंद’ला साताऱ्यात अल्प प्रतिसाद

मुस्लीम व दलित संघटनांची दुचाकी रॅली

सातारा  – जमियत – उलेमा – ए – हिंद व परिवर्तनवादी बहुजन संघटनांनी “सीएए’ व “एनआरसी’ कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या “भारत बंद’ला बुधवारी साताऱ्यात अल्प प्रतिसाद मिळाला. सातारा शहरात नेहमीप्रमाणे दळणवळण व व्यवहार सुरू राहिल्याने बंदचा फारसा प्रभाव जाणवला नाही.

“भारत बंद’च्या निमित्ताने जमियत – उलेमा- ए – हिंद व बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांच्या आंदोलकांनी सातारा शहरातून दुचाकी रॅली काढली. ही रॅली पोवई नाक्‍याकडून राजवाडा गांधी मैदान येथे नेण्यात आली. याठिकाणी “सीएए’ व “एनआरसी’ कायद्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी राजवाडा परिसरात काही काळ बंद सदृश वातावरण जाणवत होते. मात्र व्यापाऱ्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे सकाळी साडेदहाच्या नंतर दुकाने उघडून कामकाज सुरू ठेवले. रिक्षा व बसेस चालू राहिल्याने विद्यार्थी वाहतूक सुरळीत राहिली. सातारा शहरातील जनजीवनावर भारत बंदचा कोणताही प्रभाव पडल्याचे दिसून आले नाही. साताऱ्यात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.