मुंबई – अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी “रामसेतू’ हा चित्रपट खूपच चर्चेत आहे. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्यामध्ये रामसेतु या महत्वाच्या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाचं शूटिंग ३१ जानेवारीला अयोध्येत पूर्ण झाले. याच आठवणीत अक्षयने चित्रपटाच्या सेटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडियोमध्ये अक्षय कुमार आपल्या चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. ज्यामध्ये ”आज माझ्या ‘रामसेतू’ चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. रामसेतू तयार करण्यासाठी त्याकाळात वानर सेनेने काम केले होते. त्याचप्रमाणे माझ्या रामसेतु चित्रपटासाठी काम करणारी माझी ही वानरसेना आहे” अस म्हणतं त्याने कॅमेरा चित्रपटातील सह कलाकारांकडे फिरवल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा हे करणार आहेत. अक्षय कुमारचा प्रोडक्शन हाउसच “रामसेतू’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली. मात्र, चाहत्यांमधील उत्सुकता आतापासून शिगेला पोहोचली आहे.