मुंबई – ‘बाहुबली’ला मिळालेल्या अफाट यशानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसह आलिया भट्ट आणि अजय देवगण झळकणार आहेत.
हा चित्रपट सर्वप्रथम जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु त्याची रिलीज डेट पोस्टपॉन करण्यात आली होती. यानंतर ‘आरआरआर’ 7 जानेवारी 2022 ला रिलीज होणार होता. पण पुन्हा एकदा त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. करोनाचा प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच चित्रपटसृष्टीवरही मोठा परिणाम झाला असून, ‘आरआरआर’ला सुद्धा याचा फटका बसला.
#RRRonMarch25th, 2022…..
FINALISED! 🔥🌊@ssrajamouli @tarak9999 @AlwaysRamCharan @ajaydevgn @aliaa08 @RRRMovie @DVVMovies #RRRMovie pic.twitter.com/622qfdRUUX— DVV Entertainment (@DVVMovies) January 31, 2022
दरम्यान, ‘आरआरआर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाची आगामी फायनल तारीख सांगितली आहे. येत्या 25 मार्चला ‘आरआरआर’ चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अशी अधिकृत माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली. दिग्दर्शक राजामौली यांचा हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे.