बाॅल-टॅम्परिंग प्रकरण : विंडीजच्या ‘या’ खेळाडूला आयसीसीचा दणका

दुबई : वेस्ट इंडिज संघाचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन याच्यावर बुधवारी चेंडू कुरतडल्याप्रकरणी (बाॅल-टॅम्परिंग) आयसीसीने बंदीची कारवाई केली आहे. चेंडूचा आकार कृत्रिम पध्दतीने बदलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पूरनवर चार सामन्यांची बंदी घातली आहे. तसेच त्याच्या खात्यावर ५ डिमेरिट गुणदेखील जमा करण्यात आले आहेत.

अफगाणिस्तान विरूध्दच्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अंगठ्याच्या नखाने चेंडू कुरडताना आढळ्यामुळे पूरनवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने आपली चूक मान्य केली अाहे. या शिक्षेनंतर पूरन वेस्टइंडिज संघाकडून चार टी-२० सामने खेळू शकणार नाही.

दरम्यान, लखनऊमध्ये सोमवारी वेस्टइंडिज विरूध्द अफगाणिस्तान हा सामना झाला होता. या सामन्यात शाई होपच्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्टइंडिजने हा सामना ५ गडी राखून जिंकला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.