नवी दिल्ली : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधासभा निवडणुकीत भाजपला भरभरून यश मिळाले आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपने आपली सत्ता काबीज केली. या सर्वात महत्वाची होती ती उत्तरप्रदेश निवडणूक यातही भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत भाजपने यश मिळवले. मात्र राज्यातील निवडणूक ही एका महिलेचा संसार उद्वस्त करणारी ठरली आहे,
झालं असं कि, उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यात एका मुस्लीम महिलेला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. याचे कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बरेलीतील उझ्मा अन्सारी यांनी भाजपला मतदान केल्याने त्यांना घरातूनबाहेर काढण्यात यात आलेच पण त्यांना त्यांच्या पतीकडून तीन तलाक देण्याची धमकीही देण्यात अली असल्याचे सांगण्यात आले आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. उझ्मा अन्सारी यांनी त्यांच्यावरील आपबिती माध्यमाना सांगितली. यावेळी बोलताना, त्यांना घरातून हाकलण्यात आलं आहे. तसंच त्यांना तीन तलाकची धमकीही देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. उझ्मा या गौंतिया इजाजनगर इथल्या रहिवासी आहेत. त्यांना त्यांच्या पतीचे मामा तयब यांनी समाजवादी पक्षाला मत देण्यास सांगितले होते. पण त्यांनी भाजपाला मत दिल्याने आता त्यांना तीन तलाकच्या धमक्या देण्यात येत आहेत.
उझ्मा यांना ११ मार्च रोजी घरातून हकलण्यात आले. बरादरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि चौकशीही सुरू झाली आहे. आपल्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहणाऱ्या उझ्मा यांनी भाजपाला मत दिलं होतं कारण नरेंद्र मोदींच्या सरकारने तीन तलाकवर कायदेशीर बंदी घातली होती. उझ्मा यांनी माध्यमांना सांगितलं की, त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नाही, त्यांना चार बहिणी आहेत आणि त्यांचे वडील मजूर आहेत. महिन्यातून दोन वेळा भाजपा सरकारकडून मोफत किराणा आणि इतर अत्यावश्यक गोष्टींचं वाटप केलं जातं हे त्यांना आवडलं.
उझ्मा पुढे म्हणाल्या की, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घरात तयब (उझ्मा यांच्या पतीचे मामा ) उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार येणार अशी चर्चा करत होता. त्यावेळी बोलताना उझ्मा यांनी सांगितलं की मीही योगींच्या बाजूने मत दिलं आहे. त्यानंतर संतापलेल्या तयब यांनी उझ्मा यांना तीन तलाकची धमकी दिली आणि सरकारलाच आता घटस्फोटापासून तुला वाचवायला सांग अशी धमकी दिली. तसेच मला माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली, असेही उझ्मा यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.