मालवण – 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी वायंगणी येथील लाचकोर तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. वाळू उपशावर कारवाई न करण्यासाठी तोंडवळी गावातील वाळू व्यावसायिकाकडे या तलाठ्याने लाचेची मागणी केली होती. विठ्ठल वैजीनाथ कंठाळे, वय 34 असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे आपल्या मित्रां समवेत तोंडवळी खाडी किनारी वाळूचा व्यवसाय करतात. कंठाळे वाळूच्या गाड्या थांबवून कारवाई न करण्यासाठी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून याठिकाणी वाळू उपशाचे टेंडर मंजूर होऊनही अद्याप वाळू उपशाचे पास प्राप्त न झाल्याने गेले 15 ते 20 दिवस तक्रारदार यांनी वाळू उपसा बंद ठेवला असतानाही तलाठी कंठाळे यांनी त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती.
तलाठी कंठाळे यांनी 50 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने ही कारवाई केली यामध्ये तलाठी कंठाळे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पण झाले.