मुंबई : देशातील वाढती तस्करी एनसीबी कसून कारवाई करत आहे असे असले तरी गुन्हेगार तस्करी करण्यासाठी अजब गजब आयडियांचा वापर करत आहे. अशातच पुन्हा एकदा मुंबई विमानतळावर तस्करीसाठी महिलांनी ज्या पद्धतीचा वापर केला होता त्यानंतर अधिकारीही शॉक झाले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर तीन महिलांना सोनं तस्करीसाठी काँडमचा उपयोग केला आहे. त्यांनी काँडममध्ये सोनं भरून प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवलं होतं. मात्र या महिला जेव्हा स्कॅनिंगसाठी गेल्या तेव्हा त्यांना महिलांच्या पोटातून तब्बल 50 लाखांहून अधिक किमतीचं सोनं सापडलं आहे.
एनसीबीच्या टीमने मुंबई विमानतळावरुन तीन महिलांना अटक केली आहे. स्कॅनिंगदरम्यान महिलांच्या पोटातून तब्बल 50 लाखांहून अधिक किमतीचं सोनं सापडलं आहे. पुढे चौकशी मध्ये या महिला पँटमध्ये ड्रग्ज लपवून आणत असल्याची समोर आले.
पोलिसांनी अटक केलेल्या महिला केनियातील असून त्या केनियाहून कतारला गेल्या आणि त्यानंतर मुंबईला आल्या होत्या. एनसीबीने त्या तीन महिलांना कस्टम्सकडे सोपवलं आहे.