नवी दिल्ली – कमलनाथ सरकारवर नाराज काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मध्यप्रदेशमधील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सध्या ज्योतिरादित्य सिंधिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दिल्लीत गेले आहेत. ते आज संध्याकाळीच भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
Congress leader Jyotiraditya Scindia tenders resignation to Congress President Sonia Gandhi pic.twitter.com/GcDKu3BLw8
— ANI (@ANI) March 10, 2020
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया नाराज होते. कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेल्याने ही नाराजी उघडपणे समोर आली होती. आता ट्विटरवर त्यांनी राजीनामा पोस्ट केला आहे. काँग्रेससाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जातो आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा देणं काँग्रेसची पिछेहाट ठरू शकते. आज मोदी-शाह यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.