Shivsena UBT – शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर देखील समता पक्षाने दावा सांगितला आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ या चिन्हापाठोपाठच आता मशाल हे चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचे समता पक्षाने म्हटले आहे. शिवसेना पक्ष शिंदेंकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्हं दिले होते. निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.
आजपासून (११ जानेवारी) ज्या पक्षांना कॉमन पक्ष चिन्ह हवे असेल त्यांना दिले जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करणार आहे. तसेच चिन्हासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचाही दावा समता पक्षाने केला आहे.
यापूर्वी केला होता दावा । Shivsena UBT
मशाल या चिन्हावर दिवगंत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने दावा केला आहे. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. तर २००४ मध्ये समता पक्षाची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह बहाल केले, अशी प्रतिक्रिया समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी दिली आहे.
याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला इमेल पाठवून चिन्हावर हक्क सांगितला असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या घडामोडी
निकाल शिंदेंच्या बाजूने लागताच नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…
‘विधानसभा अध्यक्षांचा निकाल दबावातून’ – मुख्यमंत्री शिंदेंचे निकालावर प्रश्नचिन्ह…