केंदूर (पुणे) – करंदी (ता. शिरूर) येथील शिवराम डोंगर परिसरात कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करण्यात केले आहे. यामुळे येथील शिवराम डोंगर हिरवागार होण्यास मदत होणार आहे.
बारामती कृषि महाविद्यालयाचे तुषार गाडेकर, ऋषिकेश भाकरे, प्रदीप तांबे आणि सोनई कृषी महाविद्यालयचे अक्षय घोलप या विद्यार्थ्यांनी करंदी येथील शिवराम डोंगर परिसरात करंज झाडांची लागवड केली. ग्रामीण कृषी कार्यानुभव या प्रकल्पाअंतर्गत या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, किरण ढोकले, जावेद इनामदार आदी उपस्थित होते.