सणबुर -हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 08 व्या पुण्यस्मरण व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेत पाटण विधानसभा मतदारसंघात 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला होता.
सातारा जिल्हयाकरीता 03 लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उदिष्ट देण्यात आले आहे.त्यातील 01 लाख शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात करण्याचे उद्घीष्ट होते. त्यानुसार आज पाटण मतदारसंघातील शिवसेना सदस्यांची नोदंणी केलेले 71 हजार अर्ज ना. शंभूराज देसाई यांनी जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांचेकडे सुपुर्द केले.यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वेळ कमी मिळाल्याने उर्वरीत राहिलेले 29 हजार नोंदणी अर्ज मुंबई येथे सुपुर्द करण्यात येणार आहेत.