मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक शिवसेना आमदार अडचणीत येताना दिसून येत आहे.शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव या अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.यामिनी यशवंत जाधव यांनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांची पराभव केला होता.
याबाबत संपूर्ण वृत्त असे की,’ यामिनी जाधव यांनी २०१९ सालच्या विधानसभा निवडणूक लढवत असताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. ही चुकीची माहितीबाबत प्रतिज्ञापत्राची तपासणी वेळी उघडीस आली आहे.
या पत्रात त्यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे जाधव यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले होते. मात्र तपासात प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी आहे असे स्पष्ट झाले. हे तपासणी वेळी उघड झाले आहे. आयकर विभागाचं म्हणणं आहे की, प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, यामिनी यांच्यावर १ कोटींचे कर्ज आहे परंतु हा पैसा त्यांचाच आहे.
त्यामुळे आता शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्यानंतर आमदार यामिनी जाधव अडचणीत आल्यानं शिवसेना नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे.