लोणी काळभोर – शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा खो- खो संघटनेच्या मान्यतेने 14 वर्षांखालील मुलांची निमंत्रित जिल्हास्तरीय शिवसेना चषक खो- खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच वंदना काळभोर यांनी दिली.
वंदना काळभोर म्हणाल्या की, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. शनिवार दि.21 व रविवार दि.22 रोजी होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा संघटक रमेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहे. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राहुल काळभोर, सरपंच अश्विनी गायकवाड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अमृत काळभोर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, विजय ननवरे, उद्योजक राहुल काळभोर, हेमंत हाडके, प्रदीप क्षीरसागर, रमेश काळभोर, संतोष भोसले, गणेश गायकवाड, सचिन राठी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांची रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा खो- खो संघटनेच्या मान्यतेने व नियमांनुसार खेळवली जाणार आहे, अशी माहिती काळभोर यांनी दिली.