कॉंग्रेसला रामराम करून शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश
गोंदवले – माण- खटावचे युवानेते शेखर गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दिवड, ता. माण येथील राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरपंच संतोष काटकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दिवड गाव संपूर्ण भगवेमय झाले आहे.
शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीत असताना गाव, वाड्यावस्त्यावर तळागाळापर्यंत जावून पक्षसंघटना मजबूत करत पक्षाला उभारी दिली होती. जनतेनेही पक्ष म्हणून नाहीतर शेखर गोरे यांच्या कामाची पद्धत बघून राष्ट्रवादीला खंबीर साथ दिली होती. मात्र आपल्या नेत्यावरच राष्ट्रवादीने अन्याय केल्याबद्दल मतदारसंघातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्या नाराजीचा सूर दिसू लागल्यानेच शेखर गोरे यांच्यावर प्रेम करणारी जनता राष्ट्रवादीला सोडून आपल्या नेत्याबरोबर जाताना दिसत आहे.
नुकतेच माण पंचायत समितीच्या सदस्यांनी शेखर गोरे यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ दिवडी येथील कॉंग्रेसच्या सरपंचासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात दिवड गावचे सरपंच संतोष काटकर, माजी सरपंच सयाजी कदम, बबनराव सावंत, ग्रा. पं. सदस्य नानासो जाधव, सचिन जाधव, माजी ग्रा. पं. सदस्य निलेश शिर्के, मानव अधिकार महाराष्ट्र राज्याचे सचिव गणेश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शेखर गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विविध विकासकामे करताना शेखर गोरे कोणतेही आश्वासन देत नाहीत तर ऑन द स्पॉट कामे करणारा नेता म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. त्यांची काम करण्याची पध्दत व कार्यकर्ते, जनतेविषयी असलेल्या आपुलकीने आम्ही भारावून गेलो आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत त्यांना साथ देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
संतोष काटकर, सरपंचदिवड येथील सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे दिवड गाव शिवमय झाले आहे. यापुढे या गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी असेल.
शेखर गोरे