शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांची माहिती
शिरूर(प्रतिनिधी) – शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात 25 हजार ते 50 हजार लोकसंख्या गटात शिरुर नगरपरिषदेचा पश्चिम महाराष्ट्रात 16 वा क्रमांक तर महाराष्ट्रात 15 वा कमांक आला असल्याची माहिती शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
गुरुवार दि. 20/08/2020 रोजी केंद्रीय नगर विकास मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी ऑनलाईन वेबीनारव्दारे स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची क्रमवारी घोषित केली. स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत केंद्रशासनाच्या पथकाने शिरुर शहरातील स्वच्छता विषयक विविध पैलुंच्या अनुषगाने मुल्यमापन केले. यामध्ये, हागणदारी मुक्त शहर, कचरामुक्त शहर स्टार मानांकन, घनकचरा विलगीकरण, संकलन, वाहतूक, खतनिर्मिती प्रक्रिया, जनजागृती शिरुर नगरपरिषदेस 6000 पैकी 4388.81 गुण मिळाले.
शिरुर नगरपरिषद शहरात 100 % कच-याचे संकलन 12 घंटागाडी करत आहेत, 100 % कच-याचे विलगीकरण करुन, कंपोस्ट खतनिर्मिती करीत आहे. खतनिर्मीती नगरपरिषदेने चालू केली आहे. नगरपरिषदेने 10 घंटागाडयाचे गृप तयार केलेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्या गृपवर सूचना करता येतात. तसेच नगरपरिषदेने कचराकुंडी मुक्त शहर केलेले आहे.
“शहर स्वच्छतेच्या सुविधा करण्यावर विशेष भर देऊन शिरुर नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये प्रथम मानांकन मिळविणेसाठी नागरिकांचे सहकार्याने प्रयत्न करणार.
-वैशाली वाखारे, नगराध्यक्ष शिरुर नगरपरिषद घोडनदी
शहरात प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी उपाययोजना केलेल्या आहेत. तसेच वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी नागरिकांना अनुदान दिले जात आहे. प्रत्येक प्रभागामध्ये नियमित रस्ता सफाई केली जात आहे. शिरुर नगर परिषदेस हागणारी मुक्ती मध्ये ODF ++ दर्जा प्राप्त झाला आहे.
“शिरुर शहराचे राष्ट्रीय स्तरावर नाव लौकीक व्हावा यासाठी शिरुर शहरात स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांनी दिलेल्या अभिनव कल्पना राबविणे,स्वच्छता विषयक नविन संकल्पना राबवून शिरुर शहराचा प्रथम क्रमांक आण्ण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार.
-प्रकाशभाऊ रसिकलाल धारीवाल (सभागृह नेते, शिरुर नगरपरिषद, घोडनदी)
शहरामध्ये संपूर्ण भुयारीगटार योजना असून 65 mid चा STP प्लॅट असून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाणी नदीत सोडण्यात येत आहेत. तसेच जनजागृती स्वच्छते बाबत जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविदयालय विविध संघटकांनी सहभाग केलेला होता.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये कटोर परिश्रम घेणा-या सर्व अधिकारीव स्वच्छता कर्मचारी यांचे अभिनंदन. आगामी काळात सर्व मिळून यापेक्षा चांगले मानांकन मिळवण्याचा प्रयत्न करणार.
– विठ्ठल पवार , सभापती आरोग्य व स्वच्छता समिती
शिरुर शहरास राज्यात 15 वा क्रमांक व भारतात पश्चिम विभागात 16 क्रमांक प्राप्त करण्यासाठी सभागृह नेते प्रकाशभाऊ रसिकलाल धारीवाल, वैशाली वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे नेतृत्वाखाली अभियंता टेकचंद नेमाडे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे , स्वच्छता कर्मचारी, नगर परिषदेचे सन्मा. सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शिरुर शहरात यंदा पश्चिम महाराष्ट्रात 16 वा क्रमांक तर महाराष्ट्रात 15 वा कमांक आला आहे. यांचा मला आनंद आहे. यासाठी सर्व अधिकारी, कर्मचा-यांचे योगदान लाभले आहे. नागरिकांनी यात चांगला सहभाग घेतला सगळयांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. आगामी काळात यापेक्षा चांगले काम करुन दाखवू
– महेश साहेबराव रोकडे , मुख्याधिकारी, शिरुर नगरपरिषद घोडनदी