सविंदणे : शिरूर न्यायलायाच्या आवरात एका व्यक्तीने आपल्या सासू आणि पत्नीवर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये पत्नी मरण पावली असुन आरोपीच्या सासूवर उपचार सुरू आहेत.
शिरूर न्यायालयात घरगुती केसच्या संदर्भात न्यायालयात केसच्या सुनावनीसाठी आलेल्या दिपक ढवळे रा. ढवळगाव,सध्या रा. अंबरनाथ ( ठाणे ) ता. श्रीगोंदा, जिल्हा. अहमदनगर या नवऱ्याने त्याचा भाऊ संदिप ढवळे याच्या मदतीने बायको व सासूवर पिस्तुलाने हल्ला चढवला. त्यात बायको मयत झाली असून सासूवर वेंदात हॉस्पिटल शिरूर येथे उपचार सुरू आहे.
आरोपींना तात्काळ पाठलाग करून रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस ऊपनिरीक्षक देविदास कंरडे, शुभांगी कुटे , पो. अंमलदार ब्रम्हा पवार, संतोष औटी, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नजिम पठाण, पोलिस अंमलदार रांजेंद्र गोपाळे, प्रविण पिठले, संतोष सांळुंके यांनी दोनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मयत महिलेचे नाव मंजुळा उर्फ मंजुश्री संदीप ढवळे , तर मयत महीलेची आई तुळसाबाई रंगनाथ झांबरे रा. वाडेगव्हाण या गंभीर जखमी आहे.