मुंबई : जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात १२वी चा निकाल लागणार अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र आता मिळलेल्या माहितीनुसार १२ वी चा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी ८ जूनला लागणार आहे. हा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC #results@CMOMaharashtra@MahaDGIPR pic.twitter.com/sZm0rCi3fo
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022
दरम्यान बऱ्याच अडचणींचा सामना करीत या परीक्षा झाल्या होत्या. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पेपर चेकिंगवर बहिष्कार टाकला आणि बारावीचा रिझल्ट कसा लागणार आणि कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता . बारावीचा रिझल्ट उशिराच लागणार असं सगळ्यांना वाटू लागले होते . पण अखेर आज प्रतीक्षा संपलेली आहे. बारावीचा रिझल्ट सांगितलेल्या वेळेत जाहीर करण्यात आलेला आहे. हा रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकतो. उद्या 8 जून 2022 रोजी बारावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे. तुमच्याकडे जर पुरेशी माहितेय असेल तर तुम्ही तुमच्यासहित इतरांचा देखील निकाल वेबसाईटवर पाहू शकता.
कुठे पाहाल निकाल ?
–उद्या दुपारी १ वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.
–हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे.
–निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे.