शिक्रापूर (शेरखान शेख) – शिरूर-हवेली मतदार संघाचे आमदार ॲड. अशोक पवार हे नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असताना आता त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी चक्क ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या दुचाकीवरून प्रवास करत अडचणी समजून घेतल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
शिरूर हवेली मतदार संघाचे आमदार तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक ॲड. अशोक पवार हे नेहमीच मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असतात. मागील आठवड्यात त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ऊस वाहतूकदाराची बैलगाडी खड्ड्यातून स्वतः ढकलल्याने चर्चेत आले होते, तर आता परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी चक्क एका ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या दुचाकीवर बसून प्रवास करत परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेतल्या आहे.
शिरूर हवेली मतदार संघांमध्ये अतिशय खेड्या पाड्यातील व कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरी आवर्जून जाणारे, गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करणारे, सर्वसामान्यांचे आमदार म्हणून ॲड. अशोक पवार यांची ओळख आहे. त्यांच्या साधे पणाचा आणि त्यांच्या कार्याचा ठसा हा दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे. सध्या त्यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दुचाकीवर बसून झालेला प्रवास मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे.