सविंदणे (प्रतिनिधी) – आण्णापूर (ता. शिरूर) या गावात विद्युत तार तुटल्यामुळे आणी बेकायदेशीर आकड्यामुळे वायर मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून मेंढपाळाच्या जवळपास सात ते आठ मेंढयांचा मृत्यू झाला आहे.
यात अविनाश माळी (रा. आण्णापूर) या मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने अविनाश व त्याची आजी इंदूबाई माळी यांचा विजेच्या करंटने लांब फेकल्याने दैव बलवत्तर म्हणूण जीव वाचला आहे.
शिरूर तालुक्यातील महीनाभरात ही दुसरी घटना असून महीनाभरापुर्वी रांजणगाव सांडस (ता. शिरूर) या ठिकाणी भिमानदीकाठी मोटारीचा विदयुत प्रवाह नदीपात्रात उतरल्याने गाई पाणी पिण्यासाठी गेल्या असता 6 गायांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे इतर गाई वाचल्या होत्या.शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी विदयुत तारा जीर्ण झाल्या असून त्या बदलण्यासाठी महावितरणची उदासीनता दिसून येत आहे.
विद्युत तार तुटल्यामुळे आणी आकड्यामुळे आर्थिंगमधून विद्युत प्रवाह जमिनित उतरल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे मेंढपाळांनी सांगितले. मेंढपाळालाही विद्युत करंट लागला होता परंतु त्यांना लांब फेकल्यामुळे ते बचावले गेले असे त्यांनी सांगितले. सदर प्रकरणी महावितरणने सर्व सखोल चौकशी करून मेंढपाळाला मदत करावी अशी मागणी परीसरातील नागरीकांकडून होत आहे.