मुंबई – बॉलिवूड स्टार जिकडे जातील तिकडे मीडियावाले पोहचतात. हल्ली बॉलिवूड स्टारच्या शॉपिंग पासून ते मिटिंगपर्यंतचे सगळे व्हिडीओ मीडियाला हवे असतात. मग स्टार एखाद्या विमानतळावरून जात असो किंवा आपल्या डॉगीला घेऊन जिमला जात असो सोशल मीडियावर असे व्हिडीओ चांगलेच धुमाकूळ घालतात. मात्र स्टार्सना याचा अनेकदा त्रासही होतो. असाच एक प्रसंग अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत नुकताच घडला यावेळी ती थेट कॅमेरामॅनवर चिडलेली दिसून आली.
शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये ती एका बिल्डिंगमधून बाहेर येते आणि समोर असलेले कॅमेरामन तिला पोज देण्यासाठी सांगतात. त्यावर शिल्पा शेट्टी देखील आनंदात मस्ती करत पोज देताना व्हिडिओमध्ये दिसते. यावेळी तिचा लूकही अगदी एखाद्या डान्सरप्रमाणे वाटत होता. फोटोजसाठी पोज दिल्यानंतर ती पुढे जायला निघते मात्र कॅमेरापर्सन आडवे येतात आणि ती चिडते. “तोंडात घुसून फोटो काढशील का?” असा सवाल करत शिल्पा गाडीत बसून निघून जाते.
शिल्पा सोशल मिडीआयवर चांगलीच सक्रिय असते. बालदिनानिमित्त देखील तिने आपल्या मुलांसोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. शिल्पाचा भडकलेला हा अंदाज पहिल्यांदाच कॅमेरासमोर आला.