मुंबई – दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक नृत्य दिन अजून काही दिवसांवर आहे, पण बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आधीच या आपला डान्स जलवा दाखवताना दिसली. शिल्पाने सोशल मीडियावर स्वतःचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती डान्स करताना वर्कआऊट देखील करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. मॅट सेशन करत असताना शिल्पा शेट्टी अचानक डान्स करू लागली. गंमत म्हणजे ती व्यायाम करता करता डान्स देखील करताना दिसून येत आहे. म्यूजिकच्या बीटवर डान्स करून शिल्पा शेट्टीने फिटनेसची अनोखी शैलीच सर्वांना दाखून दिली आहे.
व्यायाम करणारी शिल्पा शेट्टी जेव्हा म्युजिक बिट प्रमाणे व्यायाम मूव्ह करते त्यावेळी ती अवघड काम देखील किती सोप्या पद्धतीने करत आहे याचा प्रत्यय येतो. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने कॅप्शन लिहिले की, “वर्ल्ड डान्स डे शनिवारी जगभरात साजरा केला जाईल, पण मी तो संपूर्ण आठवडा साजरा करेन. म्हणून, मी माझ्या वर्कआउट्समध्ये एक मनोरंजक घटक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाठ, पोट आणि अनेक स्नायूंसह संपूर्ण शरीरासाठी ही कसरत दिनचर्या उत्तम आहे. मला ते इतके इंटरटेनिंग वाटले की मी आज माझ्या मुख्य प्रशिक्षण दिवसात त्याचा समावेश केला आहे”
View this post on Instagram
शिल्पा शेट्टीने आपल्या चाहत्यांनाही या स्टाईलमध्ये वर्कआउट करण्यासाठी प्रेरित केले आहे. शिल्पा शेट्टी फिटनेसच्या बाबतीत नेहमीच पुढाकार घेत असते. जिम पासून ते योगा आणि डायट पर्यतच्या अनेक गोष्टी ते चाहत्यांमध्ये शेअर करत असते. शिल्पाचा हा हटके अंदाजातील वर्कआऊट चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. एक नंबर… अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्या एकाने ‘आता तर पार्टीमध्ये सुद्धा असाच डान्स वर्कआऊट करणार’ असल्याचे म्हंटले आहे.