मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी किती फिटनेस फ्रीक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. ती तिच्या जिम वर्कआउट, योगा, ध्यान, आहार, सर्व गोष्टींची पूर्ण काळजी घेते. शिल्पासाठी दैनंदिन आहाराइतकाच दैनंदिन व्यायामही महत्त्वाचा आहे. शिल्पाने वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जमिनीवर बेशुद्धावस्थेत दिसत आहे.
View this post on Instagram
शिल्पा प्रत्यक्षात बेशुद्ध झालेली नाही, मात्र तिचे दिवसाचे वर्कआउट सेशन खूप मोठे होते. एवढ्या प्रदीर्घ वर्कआउट सेशननंतर शिल्पा पूर्णपणे थकली आणि जमिनीवर पडली. जमीनीवर पडल्याचा हा व्हिडिओ तिने मजेशीर पद्धतीने बनवला आहे. शिल्पाला अशा अवस्थेत पाहून तिचा ट्रेनरही हसताना दिसत आहे. शेवटी शिल्पा उठते आणि म्हणते ‘मंडे मोटीवेशन, मार डाला…अल्लाह…’.
अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये चाहत्यांना व्यायाम करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. ‘आजचं फिटनेस सेशन जानेवारी 2022चं खूप जास्त वेळ चालले. महिन्याचा शेवट, मोटिवेट करणं, मॅटवर लेटून राहणं आणि स्वत:ला एक महिन्यासाठी मानसिक रूपाने तयार करण्याचा आहे. पण हो, मलाही असे दिवस बघावे लागतात. फक्त एक गोष्ट मला प्रेरित करते, ती म्हणजे तुमचं प्रेम. आणि मग परत मी माझ्या रूपात येते’.