शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या लग्नाला आता बरीच वर्षे झाली. त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या वेळी बऱ्याच बातम्या आल्या होत्या. राज कुंद्राच्या पहिल्या बायकोने म्हणजे कविताने आपल्या घटस्फोटाचा ठपका शिल्पावर ठेवला होता.
त्यानंतर राज आणि कविता वेगळे झाले. राज आणि शिल्पाचा संसार सुखाचा सुरू असल्याचे दिसते. मात्र, नेटवर पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे राज कुंद्रा भडकले आहे. तो म्हणतो इतके वर्षे मी गप्प बसलो. मात्र आता खूप झाले. मुळात शिल्पा या घटस्फोटाला जबाबदार नाही. स्वत: कविता त्यासाठी कारणीभूत आहे.
राजच्या म्हणण्यानुसार ते जेव्हा लंडन येथे राहात होते. तेव्हा कविताचे त्याच्या बहिणीच्या नवऱ्याशी अफेअर होते. आमच्या कुटुंबातील लोकांना अगदी आमच्या ड्रायव्हरलाही काहीतरी संशयास्पद वाटत होते. मात्र, त्यावेळी मी त्याकडे दुर्लक्ष केले.
पण एकदा त्याला बाथरूममध्ये कविताने लपवलेला तिचा दुसरा फोन सापडला. त्यात तिने त्याच्या मेव्हण्याला केलेले मेसेजेस वगैरे त्याने पाहिले आणि त्याला सगळे लक्षात आले व खरे काय ते समजले.
नंतर त्याने कविताला आणि त्याच्या चाळीस दिवसांच्या मुलीला भारतात आणून सोडले. घटस्फोटाची तयारी सुरू केली. शिल्पा नंतर त्याच्या आयुष्यात आली. त्यामुळे शिल्पावर याचा ठपका ठेवणे चुकीचे आहे.
उलट त्या काळात आपण ज्या मानसिक स्थितीतून जात होतो तेव्हा शिल्पानेच आपल्याला मोठा आधार दिल्याचे तो म्हणतो. आता इतक्या वर्षांनी पुन्हा जुनी माहिती आणि व्हिडिओ जारी करण्यामागे केवळ आमची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश असू शकतो, दुसरे काही असाही त्याचा दावा आहे.
त्याहीपुढे जात त्याने सनसनाटी दावा केला आहे. ब्रिटनच्या एका टॅबलॉईडकडून कविताने पैसे घेत त्यांच्या घटस्फोटाची स्टोरी त्यांना विकली. तिने तिचे बॅंक स्टेटमेंट दाखवले तरी सगळे स्पष्ट होईल असा त्याचा दावा आहे.