धूम ही बॉलीवूडमधील आतापर्यंत सर्वात जास्त चर्चा झालेली ऍक्शन फ्रॅंचायजी ठरली आहे. या फ्रॅंचायजीचे आतापर्यंत तीन सिनेमे होऊन गेले आहेत. पहिल्या दोन सिनेमांना जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता. तर तिसऱ्या भागाला जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. आता चौथ्या भागाची तयारी सुरू झाली आहे.
यशराज प्रॉडक्शनने अद्याप काहीही कन्फर्म केलेले नसले तरी चर्चा तरी ऐकू यायला लागली आहे. “धूम-4’मध्या अक्षयकुमार आणि सलमान खान असणार आहेत अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावरच्या ट्विटमधून सुरू आहे. या ट्विटमुळे अक्षय आणि सलमानचे फॅन खूप आनंदी झाले आहेत.
मात्र, यासंदर्भात अक्षय, सलमान अथवा यशराजच्या आदित्य चोप्राकडून काहीही स्पष्ट सांगितले गेलेले नाही. “धूम-4’ची अद्याप अधिकृतपणे घोषणाही केली गेलेली नाही.
“धूम’च्या पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुसऱ्या भागात हृतिक रोशन आणि तिसऱ्या भागात आमिर खान व्हिलन होते. आता चौथ्या भागात अक्षय व्हिलन असेल की सलमान हे लवकरच समजेल. या दोघांशिवाय जुन्याच कलाकारांना पुन्हा घेतले जाण्याची शक्यता अधिक आहे.