सनी लिओन चांगलीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही तिचा बराच बोलबाला आहे. 45.9 मिलियन तिचे फॉलोअर्स आहेत यावरून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. तिची अगोदरची प्रतिमा काय होती, हा भाग बाजूला सोडला तर हिंदी चित्रपटसृष्टीने आणि येथील प्रेक्षकांनी तिला स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच ग्लॅमरस किंवा बोल्ड आणि ब्युटीफुल हा टॅग तिच्या नावापुढे लागला गेला आहे.
View this post on Instagram
सनी तिच्या चाहत्यांना निराश करत नाही. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती सातत्याने त्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वी तिने आता माझी सटकली या कॅप्शनखाली तिचा शूटींगचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात एक ऍक्शन सीन शूट केला जात होता. मात्र नेमके त्याचवेळी सनी तिचे डायलॉग विसरली. त्याचा हा व्हिडिओ आहे.
View this post on Instagram
आता पुन्हा तिने नवा व्हिडिओ जारी केला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे. यात ती बॉलीवूडची कथित क्विन कंगना राणावतच्या लंडन ठुमकदा या गाण्यावर नाचताना दिसते आहे. यात तिचा पती डॅनियल वेबरही तिची कॉपी करताना दिसतो आहे. मात्र, त्याला काही तिच्यासारखे नाचता येत नाही. असो.
View this post on Instagram
हिंदी चित्रपटांतील गाणी आणि त्यातील नृत्य हा कधी न संपणारा विषय आहे. बाहेरच्या लोकांना कदाचित ते काहीतरी ऑड वाटत असेल. मात्र आपल्याकडच्या प्रेक्षकांना चित्रपटांत गाणी आणि डान्स नसेल तर जेवणातले मीठ हरवल्याचा फील येतो.
View this post on Instagram
म्हणूनच सनीनेही म्हटले आहे की, चांगले संगीत असेल तर त्यावर कोणीही डान्स करू शकतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की संगीत तुम्हाला चांगला डान्सर बनवते. तिच्या या व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि कॉमेंटस मिळाल्या आहेत.