शिक्रापूर- येथे जुन्या पुलाच्या जवळ एका आडोशाच्या ठिकाणी एक अवैधरीत्या दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून गावठी दारू जप्त करत एकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. कार्तिक चंदरसिंग कर्मावत (रा. करंजेनगर, शिक्रापूर) असे गुन्हा दाखल झालल्याचे नाव आहे.
पोलीस कॉन्सटेबल हेमंत पांडुरंग इनामे यांनी फिर्याद दिली. शिक्रापूरमधील जुन्या पुलाच्या जवळील एका आडोशाला एकजण गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. पोलीस नाईक अनिल जगताप, पोलीस कॉन्सटेबल हेमंत इनामे, शितोळे यांनी या ठिकाणी जात छापा टाकला त्यावेळी त्यांना एकजण त्याच्या ताब्यातील काळ्या कॅनमधून गावठी दारू लोकांना देत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला पकडत त्याच्या ताब्यातील पस्तीस लिटर गावठी दारू जप्त केली. व त्याच्यावर गुन्हा दाखल केला.