मुंबई – मॉडेल आणि अभिनेत्री शिबानी दांडेकरने आज आपला 41व्या बर्थडेचे सेलिब्रेशन केले. शिबानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती बॉयफ्रेंड फरहान अख्तरसोबतचे फोटो सतत शेअर करत असते.
यावेळी शिबानीने फरहानला खास सरप्राइज दिले आहे. शिबानीच्या या भेटवस्तूने सर्वांचे मन जिंकले आहे. शिबानीने तिच्या वाढदिवशी फरहानच्या नावाचा टॅटू काढला आहे. तिने तिच्या गळ्यावर हा टॅटू बनवला आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.
फोटोमध्ये शिवानी तिचा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसत आहे. शिबानीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर टॅटूचा फोटो शेअर केला आहे. फोटो बघून असे वाटते की, शिबानीने आताच हा टॅटू बनवला आहे. फोटोमध्ये तिची मान लाल दिसत आहे.
शिबानीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फरहानने तिच्यासाठी एक अतिशय गोंडस पोस्ट शेअर केली आहे. त्याने शिबानीसोबत एक जुना ब्लॅक आणि व्हाइट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले की,
“माझ्या मनापासून… वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यावर प्रेम करतो. फरहान अख्तरच्या पोस्टवर कमेंट करून अनेक सेलेब्सनी शिबानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.